मर्म
शब्दार्थाची उथळ घागर
जिनवाणी अथांग सागर
समतेच्याच उठती लाटा
सर्वोदयाच्या दिसती वाटा
फेनिल विरे ममकाराचा
उद्घोष रे स्व' जयकाराचा
आवर सावर तोल तुझा
वन्हि विझव अहंकाराचा
माथा टेकवावा कसा कुठे
पराधीन जो नियतीपुढे
पोषण नको रागीद्वेषींचे
वचन माता जिनवाणीचे
खरा देव असे अरिहंत
आराध्य गुण ना गुणवंत
मी सन्मति वीर अतिवीर
प्रत्येकात वसे महावीर
महावीर नसे कुणी व्यक्ती
आत्मशोधनाची अभिव्यक्ति
'स्व'ची महत्ता स्वातंत्र्य असे
सांग जगी कोण दावतसे
अनेकान्तमयी जैन धर्म
जाणून घ्यावे तयाचे मर्म ...
*वंदना चवरे दर्यापूरकर अमरावती*

No comments:
Post a Comment